What Is Computer | कॉम्प्युटर म्हणजे काय ?

0 518

What Is Computer | कॉम्प्युटर म्हणजे काय ?

मित्रहो आत्ताच आपण कॉम्प्युटर हा कोणकोणत्या क्षेत्रात कशा पद्धतीने व कशासाठी वापरला जातो हे पाहिले पण कॉम्प्युटर नक्की आहे तरी काय ?

“कॉम्प्युटर हे मानवाने तयार केलेले व अतिशय वेगवान असलेले इलेक्ट्रॉनिकइलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल मशीन आहे की ज्या मशीनचा वापर मुख्यतः गणिती व तुलनात्मक प्रक्रिया करण्यासाठी होतो.”

 

गणिती प्रक्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार किंवा भागाकार करणे व तुलनात्मक म्हणजे कॉम्प्युटरला दोन नंबर देऊन त्यातील मोठा नंबर कोणता हे ठरविले जाणे <,>, = अशा प्रकारच्या प्रक्रिया करणे म्हणजे तुलनात्मक प्रक्रिया होत. कॉम्प्युटर तयार होण्यापूर्वी गणिती प्रक्रिया करण्यासाठी कॅलक्युलेटर चा वापर केला जात असे. परंतु तुलनात्मक प्रक्रिया करणारे पहिले मशीन म्हणजे कॉम्प्युटर.

कॉम्प्युटर हे असे मशीन आहे की जे खालील गोष्टींसाठी वापरले जाते.

१. गणिती प्रक्रिया

२. तुलनात्मक प्रक्रिया

३. माहिती साठवून ठेवणे

४. साठवून ठेवलेल्या माहितीवर प्रक्रिया करून उत्तर मिळवणे

कॉम्प्युटर कडून कोणताही प्रॉब्लेम सोडवून घेण्यासाठी तो प्रॉब्लेम वरील ४ पैकी एका प्रकारात असणे गरजेचे आहे तो प्रॉब्लेम स्टेप्सच्या स्वरूपात लिहिला जातो. त्या सर्व स्टेप्सना एकत्रितपणे program असे म्हणतात. थोडक्यात कॉम्प्युटर हे एक मशीन व त्यावर आधारित असलेले प्रोग्राम असे आपण म्हणू शकतो.

गणिती प्रक्रिया करण्यासाठी कॅलक्युलेटर ऐवजी कॉम्प्युटरच का ?

१. Computer चा वापर करून गणिती प्रक्रियेबरोबरच तुलनात्मक प्रक्रिया तसेच अक्षरांवर सुद्धा प्रक्रिया करता येते.

२. Calculator मध्ये आपण दिलेले सूत्र व त्याचे उत्तर एकाच वेळी पाहता येत नाही. कॉम्प्युटर वर सूत्र व त्याचे उत्तर एकाच वेळेस पाहता येते.

३. Calculator चा वापर करून मिळालेले उत्तर कायम स्वरूपी साठवून ठेवता येत नाही. कॉम्प्युटर चा वापर करून आपण सर्व प्रकारची माहिती वर्षानुवर्षे साठवून ठेवू शकतो.

४. Calculator चा screen हा फक्त एका line चा व जास्तीत जास्त 16 digit चा असतो. परंतू त्याच्या तुलनेमध्ये कॉम्प्युटरचा screen खुपच मोठा असतो.

5. Calculator मध्ये आलेल्या उत्तराची पेपरवर hard copy (printout) घेता येत नाही, कॉम्प्युटर मध्ये साठवून ठेवलेल्या माहितीची आपण कधीही पेपरवर Hard copy (printout) घेऊ शकतो.

 

कॉम्प्युटर व टाईपरायटर मधील फरक

टाईपरायटरवर एखादा टाईप केलेला मॅटर खोडता येत नाही. कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण मॅटर टाईप करताना जर काही चुकीचे टाईप झाले तर तो मॅटर खोडून आपण नवीन मॅटर त्या ठिकाणी टाईप करू शकतो.

२. टाईपरायटरचा वापर करून अपाण जास्तीत जास्त ४ प्रती तयार करू शकतो त्यामध्ये १ मूळ प्रत असते व इतर ३ प्रती या कार्बन प्रती असतात. परंतु कॉम्प्युटरच्या सहाय्याने कितीही original प्रती मिळू शकतात.

३. टाईपरायटर मध्ये माहिती साठवून ठेवणे अशी संकल्पना नसल्यामुळे पत्र लिहून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याच पत्राच्या अजून काही प्रती नंतर हव्या असतील तर त्या मिळू शकत नाहीत. परंतु कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण कितीही माहिती साठवून ठेवू शकतो व आपल्याला हवे तेव्हा त्याची पेपरवर प्रिंट घेऊ शकतो.

४. टाईपरायटरचा वापर करून आपण अक्षरांच्या वेगवेगळ्या styles ठरवू शकत नाही. परंतु कॉम्प्युटरचा वापर करून आपण मॅटरचा साईज कमी जास्त करणे, मॅटर मधील अक्षरांच्या वेगवेगळ्या styles ठरविणे अक्षरांचा रंग बदलणे (font color) इत्यादी प्रकारे formatting करू शकतो.

 

कॉम्प्युटरची वैशिष्ट्ये

कॉम्प्युटरची मुख्य तीन वैशिष्ट्ये आहेत. ज्यामुळे कॉम्प्युटचा वापर सगळीकडे मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

  1. Speed कॉम्प्युटरचा calculation करण्याचा वेग (speed) माणसापेक्षा खूप जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीला calculation करण्यासाठी, ते calculation किती मोठे आहे त्यानुसार वेळ द्यावा लागतो. परंतु कॉम्प्युटर कितीही लहान किंवा कितीही मोठे calculation करून त्याचे उत्तर काही सेकंदाच्या आत आपल्याला दाखवितो.
  2. Accuracy- एखाद्या वेळेस माणसाकडून calculation करताना त्यामध्ये चुका होऊ शकतात. परंतु कॉम्प्युटरला दिलेल्या माहितीनुसार त्याने दिलेले उत्तर है (accurate) असते. परंतु आपल्याकडूनच माहिती देताना काही चुक झाली तर कॉम्प्युटर प्रमाणे उत्तर दाखवितो व ते उत्तर त्या माहिती नुसार बरोबर असते.

३. Memory कॉम्प्युटरची माहिती साठवून ठेवण्याची क्षमता ही माणसापेक्षा प्रचंड जास्त असते. खरे तर आपण कॉम्प्युटरची मेमरी व आपली मेमरी यामध्ये प्रत्यक्षरित्या तुलना करू शकत नाही. परंतु तरी सुद्धा कॉम्प्युटरचीच माहिती साठविण्याची क्षमता ही जास्त आहे असे म्हटले जाते.

 

कॉम्प्युटरची मेमरी व माणसाची मेमरी यामधील फरक

  1. कॉम्प्युटरची मेमरी ही एका विशिष्ट युनिटमध्ये मोजली जाते परंतु माणसाची मेमरी ही कुठल्याही युनिटमध्ये मोजली जात नाही.
  2. कॉम्प्युटरच्या मेमरीमध्ये माहिती किती साठवून ठेवायची याला मर्यादा असते. परंतु माणसाच्या मेमरीला तशी मर्यादा नसते. कॉम्प्युटची मेमरी पूर्ण भरून गेल्यानंतर ती आपल्याला बदलावी लागते किंवा नवीन मेमरी बसवावी लागते. परंतु माणसाची मेमरी अशाप्रकारे कमी जास्त करता येत नाही.
  3. काळानुसार माणसाच्या मेमरीमध्ये फरक पडतो. एखादी गोष्ट बऱ्याच वर्षानंतर माणसाच्या लक्षात राहिलच असे नाही. परंतु कॉम्प्युटरच्या मेमरीवर काळाचा कुठलाही परिणाम होत नाही. कितीही वर्षानंतर आपण मागितलेली माहिती काही सेकंदात कॉम्प्युटर आपल्याला दाखवितो.
Leave A Reply

Your email address will not be published.