HISTORY AND GENERATION OF COMPUTERS | कॉम्प्युटरच्या पिढी

0 399

HISTORY AND GENERATION OF COMPUTERS

कॉम्प्युटरच्या विकासातील विविध पायर्‍याना कॉम्प्युटरची जनरेशन किंवा पिढी असे म्हणतात. यातील विकासामुळे लहान, स्वस्त, अधिक शक्तीशाली, अधिक कार्यक्षमता असणारे कॉम्प्युटर्स बनले.

First Generation of Computer (1940-1956)

पहिल्या जनरेशनचे कॉम्प्युटर्स म्हणजे अशी मशीन्स ज्यात vacuum Tubes वापरण्यात आल्या होत्या. या काळात चुंबकीय ड्राईव्हव चुंबकीय कोअर मेमरीज विकसित करण्यात आल्या. या कॉम्प्युटर्समध्ये valves वापरण्यात येत असत त्यामुळे याचा आकार व किंमत अवाढव्य होत असे. सर्व पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटर्सची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे

 

  1. Large in size (आवढव्य आकार)
  2. Slow operating speed (कामाचा कमी वेग)
  3. Restricted computing capacity (मर्यादित क्षमता)
  4. Limited programming capabilities (मर्यादित प्रोग्रॅमिंग क्षमता)
  5. Short life span (कमी टिकाऊ)
  6. Complex maintenance schedules (क्लिष्ट देखभाल वेळापत्रक)

 

Second Generation of Computer (1956-1963)

या कॉम्प्युटर्समध्ये solid state devices चा वापर केला गेला. उदा. vacuurn tubes ऐवजी transistors चा वापर केला गेला Transistors हे जलद operating device आहे. First generations मधील computers पेक्षा या generations मधील computers हे fast आहेत. या generations मधील computers हे कमी heat generate करतात. व या computers ला कमी space, power लागते.

 

Third Generation of Computer (1964-1971)

या कॉम्प्युटर्समध्ये Integrated Circuits (IC) वापर करण्यात येत असे. जेव्हा एका सिलिकॉन चिपवर शेकडो transistors बसवता येऊ लागले तो सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. ते आधीच्या जनरेशनपेक्षा लहान होते, वेगवान होते, स्वस्त होते. कॉम्प्युटर्सच्या तिसऱ्या जनरेशनपासून storage व input-output साठी अधिक वेगवान व अधिक प्रगत साधने वापरली जाऊ लागली.

 

 

Forth Generation of Computer (1971- Present)

या कॉम्प्युटर्समध्ये microprocessors वापरले जातात. हे अगदी लहान घन कॉम्प्युटर्ससारखेच असतात जे अंकगणिती व तार्किक, क्रमवार पायऱ्यांनी कामे करू शकतात याचा आकार लहान करण्यासाठी सातत्याने संशोधन सुरू असते. त्यातूनच लार्ज स्केल इंटिग्रशेन (LSI) तंत्रज्ञान विकसित झाले. इंटेल कॉर्पोरेशनमें एलएसआय चिप्सचा वापर मायक्रोप्रोसेसर्स बनविण्यासाठी केला. कॉम्प्युटसच्या परिवारातील LSI chips वापरणाऱ्या कॉम्प्युटर्सना चौथ्या जनरेशनचे कॉम्प्युटर्स म्हणून संबोधले जाते. आता VSLI (Very Large Scale Integration) तंत्रज्ञान वापरात आणल्यावर एका चिपवर हजारो ट्रान्झिस्टर्स बसवता येतील. इंटेल P-I, P-1I, P-III, P-IV, Dual Core Core 2 duo है मायक्रोप्रोसेस मशीन्समध्ये वापरले जातात.

 

Fifth Generation of Computer (Present and Beyond)

या सिस्टिम्स एक्पर्ट सिस्टिम्स म्हणून ओळखल्या जातात. यालाच कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intelligence) असेही म्हटले. जाते. जी माणूस व मशीन यातील सुसंवाद प्रभावी करेल. तिचा वापर कॉम्प्युटरच्या पाचव्या जनरेशनमध्ये केला गेला आहे. कॉम्प्युटर्सच्या पाचव्या जनरेशनमध्ये कॉम्प्युटर्सना बुध्दीमत्ता प्रदान करण्याचा प्रयत्न आहे. मात्र हे संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे. तरीही अनेक संभाषण ओळखणाच्या यंत्रणा व रोबोज ही त्याची झलक आहे. कृत्रिम बुध्दीमत्तेचा उद्देश मानवाला पर्याय शोधण्याचा नाही व ते शक्यही नाही. याचा उद्देश मानवाला त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठीच होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.