COMPUTER SYSTEM ORGANISATION | संगणक कसा काम करतो ?

0 490

COMPUTER SYSTEM ORGANISATION

Input – इनपुट म्हणजे अंक, संख्या इ. ज्याचा वापर करून कॉम्प्युटर आऊटपुट देतो ती माहिती किंवा डेटा. यामध्ये आपण विविध अक्षरे, संख्या, आकृत्या, माहिती, तक्ते, इत्यादी कॉम्प्युटरला देतो. त्याचबरोबर कॉम्प्युटरला या माहितीचे काय करायचे त्याच्या सूचनाही द्याव्या लागतात कारण कॉम्प्युटरला स्वतःचा मेंदू नसतो, विचारशक्ती नसते. तो एखाद्या इमानी सेवकासारखा फक्त आपल्या आज्ञा पाळतो.

Process – आपण कॉम्प्युटरला जी माहिती पुरवितो, त्या माहितीवर विविध mathematical व Logical प्रक्रिया केली जाते.

Output – आऊटपुट म्हणजे सर्व input वर प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला मिळणारा निकाल किंवा परिणाम.

कॉम्प्युटर सिस्टिमचे तीन प्रमुख भाग असतात.

1) Input Unit

2) Central Processing Unit (CPU)

3) Output Unit

Input Unit- या युनिटचा वापर कॉम्प्युटरला इनपुट देण्यासाठी केला जातो. या युनिटची मुख्य कार्ये खालीलप्रमाणे

1) User’s language मध्ये input accept करणे

2) machine language Translate (binary language)

3) पुढील operation साठी input, memory ला provide पुरविणे

मुख्य इनपुट साधने म्हणजे Keyboard, Mouse, Touch Screen, Joystick, Light pen, Digitizer, Digital Camera and Mice

Central Processing Unit (CPU)

हा कॉम्प्युटरमधील सर्वात महत्त्वाचा भाग असतो. CPU कॉम्प्युटरचा आत्मा असतो. यामध्ये संपूर्ण प्रक्रिया अचूकपणे पार पाडली जाते. याचे तीन भाग असतात.

  1. a) Memory
  2. b) Arithmetic and Logic Unit (ALU)
  3. c) Control Unit

Memory – याचा उपयोग डेटा साठवण्यासाठी होतो. पुरवलेला डेटा प्रथम मेमरीत साठवला जातो व नंतर कॉम्प्युटरच्या इतर विभागांकडून पुढील कामासाठी वापरला जातो. याचे सर्वात लहान परिमाण बिट (BInary digiTs 0 and 1) आठ बिटसूना एक बाईट म्हटले जाते. कॉम्प्युटरमध्ये एक अक्षर साठवण्यासाठी आठ बिटस किंवा एक बाईट मेमरी लागते.

याचे कोष्टक खालील प्रमाणे –

8 Bits = 1 Byte

1024 Bytes = 1 Kilo Byte (KB)

1024KB = 1 Mega Byte (MB)

1024 MB = 1 Giga Byte (GB)

1024 GB = 1 Tera Byte (TB)

Arithmetic and Logic Unit (ALU)

याचा वापर arithmetic व logical हिशेबासाठी केला जातो. Arithmetic operations अगदी प्राथमिक स्वरुपाची म्हणजेच बेरीज (+), वजाबाकी ()-, गुणाकार (*). भागाकार (/) अशी असतात. Logical operations तुलनेची असतात. उदा. पेक्षा जास्त (>), पेक्षा लहान (<), बरोबर (=).

Control Unit

हा सुपरवायझरसारखे काम करतो. कॉम्प्युटरमधील सर्व काम याच्या देखरेखीखाली केले जाते. याद्वारे कॉम्प्युटरच्या इतर सर्व भागांना विशेष सूचनांची अंमलबजावणी कशी करायची त्याबाबत आज्ञा दिल्या जातात. कंट्रोल युनिटची प्रमुख कार्ये

१. मेमरी व ॲस्थ्मॅिटिक-लॉजिक युनिट तसेच इनपुट व आऊटपुट युनिटमध्ये ताळमेळ ठेवणे.

२. इतर सर्व युनिटसना योग्य प्रकारे काम करण्यासाठी मार्गदर्शन करणे

३. प्रोग्रॅम सूचना अचूकपणे अमलात आणणे

Output Unit

याचा उपयोग वापर करणाऱ्याला Output देण्यासाठी होतो. Output Unit प्रमुख कार्ये खालील प्रमाणे

1)      Machine language मध्ये memory कडून result accept करणे

2) User ला समजेल अशा भाषेमध्ये convert करणे

   3) User ला result provide करणे

मुख्य आऊटपुट भाग आहेत VDU (Visual Display Unit), printer Scanner, Plotter, Speaker and

Headphone.

HARDWARE AND SOFTWARE

HARDWARE  कॉम्प्युटरचे सर्व electrical, electronic and mechanical parts जे आपल्याला दिसतात स्पर्श करता येतात त्या भागांना Hardware असे म्हणतात. यात VDU (Visual Display Unit), printer, Scanner, Plotter, Speaker and Headphone इत्यादीचा समावेश असतो.

SOFTWARE- यात मुख्यतः दोन प्रमुख प्रकार असतात.

1) Application Software

2) System Software

Application Software  हे user किंवा software experts ने लिहिलेले प्रोग्रॅम्स असतात व ते बाजारपेठेत उपलब्ध असतात. अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरलाच “end user” software असेही म्हणतात. याची विभागणी मूलभूत व विशेष अशी केलेली असते. हे काही विशिष्ट कामे करतात.

उदा. 1) Tally software is used for accounting purpose.

2) MS-Word is used for word processing purpose.

3) Railway reservation System Program etc. Application Software सर्व क्षेत्रात वापरली जातात.

System Software  हे सॉफ्टवेअर बहुतेक वेळा उत्पादकांकडून पुरवले जाते. कॉम्प्युटरची कार्यक्षमता सिस्टिम सॉफ्टवेअरवर अवलंबून असते. हे अत्यावश्यक सॉफ्टवेअर असते. यालाच background software असेही म्हणतात. सिस्टिम सॉफ्टवेअरशिवाय आपण कॉम्प्युटरवर कामच करू शकत नाही. हे user आणि computer यात संवाद साधणारे माध्यम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.