CLASSIFICATION OF COMPUTERS | कॉम्प्युटर्सचे वर्गीकरण
CLASSIFICATION OF COMPUTERS
ऑपरेटिंग प्रिन्सियल्सच्या आधारे कॉम्प्युटर्सचे वर्गीकरण
- Digital Computers
- Analog Computers
- Hybrid Computers
-
Digital Computers
हे फक्त गणना करत काम करतात. सर्व संख्या वेगवगेळ्या अंकात किंवा डिजिटसमध्ये व्यक्त केल्या जातात. डिजिटल कॉम्प्युटर्सचा उपयोग अंकगणिती कामे व डेटाचा वापर करण्यासाठी (उदा. बिले तयार करणे, लेजर्स, समायिक समीकरणांची उत्तरे, इ.) डिजिटल कॉम्प्युटर्सचे उपयोग – विशेष हेतूने बनवलेले डिजिटल कॉम्प्युटर्स मशीन्समध्ये कायमचे बसवले जाऊ शकतात. उदा.. वाहनांमध्ये इंधन, ब्रेक्स नियंत्रित करण्यासाठी बसवलेले प्रोसेसर्स.
-
Analog Computers
हे गणना करत नाहीत तर मापन करतात. याचे नाव अॅनॉलॉग या ग्रीक शब्दावरून पडले आहे, याचाच अर्थ कॉम्प्युटर्स दोन सर्व साधारणपणे व्होल्टेज किंवा करंटद्वारे व्यक्त करण्यात येणाऱ्या संख्यांमध्ये तो साधर्म्य शोधतो. विविध समीकरणे सोडविण्यासाठी अॅनॉलॉग कॉम्प्युटर्स अतिशय शक्तीशाली साधन आहे.
अॅनॉलॉग कॉम्प्युटर्सचे उपयोग – याचा वापर प्रामुख्याने शास्त्रीय व इंजिनिअरिंग कामांसाठी केला जातो कारण ते विविध प्रमाणांवर काम करतात ज्या सतत बदलत राहतात. से फक्त अंदाने उत्तर देतात.
-
Hybrid Computers
ज्या कॉम्प्युटर्समध्ये डिजिटल व अॅनॉलॉग या दोनही कॉम्प्युटर्सची वैशिष्ट्ये असतात, त्यांना हायब्रिड कॉम्प्युटर्स म्हणतात. त्यांच्या प्रोसेसिंग व स्टोअरेज क्षमतेवरून त्यांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते
- Micro Computers
- Mini Computers.
- Mainframe Computers
- Super Computers
1. Micro Computers –
यालाच personal computers म्हणतात. यात मायक्रोप्रोसेसर चिप वापरलेली असते. याचाच अर्थ ही चिप सीपीयू ऐवजी वापरलेली असते, म्हणजेच मायक्रो प्रोसेसर चिप सीपीयूचे कार्य करते. या कॉम्प्युटरवर एका वेळी फक्त एकच माणूस काम करू शकतो म्हणूनच याला personal computer म्हणतात. Personal Computer (P.C.) ही सर्वात लोकप्रिय कॉम्प्युटर सिस्टिम आहे. याचा आकार लहान असतो मात्र त्याची कार्यक्षमता जास्त असते. यात चार प्रकार आहेत desktop, notebook, tablet PC and handheld computers.
-
Mini Computers
– हे शक्तीशाली कॉम्प्युटर्स असतात. हा सर्वसाधारण कामांसाठी वापरला जातो. यालाच midrange computers असेही म्हणतात. याचा आकार रिफ्रजरेटर एवढा असतो. Mini system हि personal computers पेक्षा महाग असते व त्याचा वेग तसेच स्टोअरेज क्षमता जास्त असते. याची रचना साधारणपणे एकाच वेळी अनेक व्यक्तींना काम करता यावे अशी केलेली असते. उदा. प्रॉडक्शन विभाग काही उत्पादन प्रक्रियांवर देखभाल करण्याकरिता नियंत्रण करण्याकरिता मिनी कॉम्प्युटर्स वापरतात, असेंब्ली-लाईन ऑपरेशन्ससाठीही याचा वापर होतो. या कॉम्प्युटर्सची निर्मिती इस१९६० मध्ये झाली. त्यावेळी मेनफ्रेम कॉम्प्युटर्स फार महाग होते. मिनी कॉम्प्युटर्स तुलनेने स्वस्तात उपलब्ध होते त्यामुळे ग्राहकांनी तेच वापरण्यास सुरुवात केली.
-
Mainframe Computers
– हे अतिशय शक्तीशाली व मोठे असतात. यावर एकाच वेळी अनेकजण काम करू शकतात यावरूनच याची क्षमता लक्षात येते. वेगवेगळ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र टर्मिनल्स या कॉम्प्युटरला जोडलेली असतात. User मेनफ्रमद्वारे याला आपली कामे सांगू शकतात. टर्मिनल म्हणजे असा एक भाग ज्यावर की बोर्ड व स्क्रीन असतो. टर्मिनलद्वारे user कॉम्प्युटला इनपुट दतो स्क्रीनवर आऊटपुट मिळवतो. याचे त्याचा आकार व किंमत यानुसार अनेक प्रकार असतात. यांचा वापर विविध संस्थात जिथे मोठ्या प्रमाणावर काम चालते, तिथे केला जातो. उदा. विमा कंपन्या त्यांच्या हजारो पॉलिसी धारकांच्या तपशीलावर प्रक्रिया करण्यासाठी मेनफ्रेम कॉम्प्युटर्सचा वापर करतात.
-
Super Computers
– नावाप्रमाणेच ‘सुपर कॉम्प्युटर्स’ सुपर शक्तीशाली असतात. अगदी मेनफ्रेम कॉम्प्युटर्स पेक्षाही. खरे तर सुपर कॉम्प्युटर म्हणजे शक्ती वाढवलेला मेनफ्रेम कॉम्प्युटरच, या सिस्टिम्स जगातील सर्वात मोठ्या असतात, अतिशय महाग असतात. यांचा वापर weather reports मिळविण्यासाठी केला जातो.