Computer Fundamentals | ओळख कॉम्प्युटर ची

Computer Fundamentals

0 339

Computer Fundamentals

Introduction

मित्रहो आजचे युग हे संगणकाचे (कॉम्प्युटर) युग आहे. सध्याच्या जगामध्ये कॉम्प्युटर ही संज्ञा जरी नवीन राहिली नसली तरी बऱ्याचश्या व्यक्तींना कॉम्प्युटरचे ज्ञान आत्मसात नाही. थोडक्यात कॉम्प्युटर कसा वापरावा हे त्यांना माहीत नाही. कुठल्याही व्यक्तीला नोकरी किंवा व्यवसाय करायचा असल्यास त्यांना कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. जगामध्ये कुठलेही क्षेत्र असे राहिले नाही जिथे कॉम्प्युटरचा वापर अजिबात होत नाही. अगदी छोट्या छोट्या दुकानापासून मोठमोठ्या कंपन्यामध्ये कॉम्प्युटरचा वापर फार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

Uses of Computer

कॉम्प्युटर खूप कामे करू शकतो. त्यामुळेच त्याचा वापर कोणत्याही किंबहुना प्रत्येक क्षेत्रात होतो. आजकाल सर्वच संस्था कामासाठी कॉम्प्युटरचा वापर करतात. हे संवादाचे जगातील सर्वात वेगवान माध्यम आहे.

कॉम्प्युटचा वापर विविध क्षेत्रामध्ये होतो.

१. शाळा, कॉलेज                                                  ६. सरकारी कार्यालये

२. हॉस्पिटल                                                          ७. बँका

३. पुस्तक किंवा CD लायब्ररी                            ८. फिल्म इंडस्ट्री

४. कंपनी                                                             ९. स्पोर्टस् इ.

५. रेल्वे/विमाने रिझर्वेशन

शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशाचे रेकॉर्ड ठेवणे, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी भरलेल्या फीचे रेकॉर्ड ठेवणे, विद्यार्थ्यांच्या मार्कसचे रेकॉर्ड ठेवणे इ. कामांसाठी कॉम्प्युटरचा वापर सध्या केला जातो. तसेच शाळा-कॉलेज मधील शिक्षकांच्या पगाराचे रेकॉर्ड आपण कॉम्प्युटरमध्ये साठवून ठेवू शकतो..

हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटरचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो याचा विचार केला तर याचे दोन भाग गृहीत धरू. एक म्हणजे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटशी संबंधित व दुसरा भाग म्हणजे पेशंटशी संबंधित, हॉस्पिटलमध्ये किती खोल्या आहेत, किती बेड आहेत, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय किती आहेत, मेडिकल instrument कोणती आहेत या सर्व गोष्टींचे रेकॉर्ड कॉम्प्युटर वर ठेवता येते. तसेच एखादा पेशंट हॉस्पिटलमध्ये कधी admit झाला? त्याला कोणता आजार झाला आहे? कोणते डॉक्टर इलाज करीत आहेत? त्याला कधी discharge मिळणार आहे. त्याचे हॉस्पिटलचे बील किती झाले? अशी सर्व माहिती व्यवस्थितपणे कॉम्प्युटरवर ठेवता येते. तसेच एखाद्या पेशंटला त्याचे नातेवाईक भेटायला आल्यावर पेशंट कोणत्या मजल्यावरील, कोणत्या रुममध्ये admit आहे याची माहिती सेकंदातच कॉम्प्युटरवर समजू शकते.

पुस्तक लायब्ररीमध्ये कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. एखाद्या लायब्ररीमध्ये किती पुस्तके आहेत? कोणत्या लेखकाची किती पुस्तके आहेत? कोणते पुस्तक कुठे ठेवले आहे? या सर्व गोष्टींची माहिती कॉम्प्युटरवर साठवून ठेवता येते. तसेच लायब्ररीचे एकूण किती मेंबर्स आहेत? त्यांनी कोणती पुस्तके घरी वाचायला नेली आहेत ? ही सर्व माहिती कॉम्प्युटरवर साठवून ठेवता येते. सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्या मेंबरने पुस्तक मागितल्यानंतर ते पुस्तक लायब्ररीत उपलब्ध आहे की नाही व असेल तर कुठे ठेवले आहे? याची माहिती सेकंदात आपल्याला समजू शकते. Video CD लायब्ररीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे रेकॉर्ड ठेवता येते.

कंपन्यांमध्ये सुद्धा कॉम्प्युटरचा वापर होऊ लागला आहे. कामगारांचे पगाराचे हिशोब ठेवणे, त्यांच्या पगाराच्या पे-स्लीप तयार करणे, कंपनीमध्ये खरेदी-विक्री होणाऱ्या मालाची माहिती ठेवणे, कंपनीचे अकाऊंटींग करणे इ. कामांसाठी कॉम्प्युटचा वापर केला जातो.

रेल्वे तिकिट रिझर्वेशन किंवा विमान तिकिट रिझर्वेशन करण्यासाठी कॉम्प्युटरचा वापर होऊ लागला आहे. पूर्वी आपल्याला पुण्यावरून मुंबईला जाण्याचे रिझर्वेशन करता येत होते. परंतू पुण्यामध्ये असताना मुंबईहून पुण्याला येण्याचे तिकीट काढता येत नव्हते कॉम्प्युटराइज्ड सिस्टीम झाल्यामुळे आपल्याला पुण्यामध्ये असतानाथ मुंबई ते पुणे असे तिकीट रिझर्वेशन करता येते. कारण रेल्वे ऑफीसमध्ये पुण्यातील व मुंबईमधील कॉम्प्युटर एकमेकांना टेलिफोन लाईनद्वारे जोडलेले असतात. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती नंतर पाहणार आहोत.

विविध सरकारी कार्यालयांमध्ये कॉम्प्युटरचा सर्रास वापर होऊ लागला आहे. पत्रव्यवहार करणे, लोकांचे रेकॉर्ड साठवून ठेवणे या कामांसाठी कॉम्प्युटरचा वापर केला जातो.

सर्व बँका या कॉम्प्युटराइज्ड झाल्या आहेत. एखाद्या व्यक्तीचे नवीन खाते open करणे, त्यांचे बँकेबरोबर होत असलेल्या सर्व व्यवहारांची नोंद कॉम्प्युटरवर करून ठेवता येते. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वतःच्या खात्यामधून पैसे काढायचे असल्यास तो व्यक्ती प्रथम withdraw slip वर सही करते, ती सही कॉम्प्युटरवर तपासली जाते व लगेचच सही बरोबर आहे की नाही हे समजू शकते कारण त्या व्यक्तीची सही खाते उघडताच कॉम्प्युटरवर साठवून ठेवली जाते. फॉर्मवर केलेली सही खराब होऊ शकते परंतु कॉम्प्युटरवर साठवून ठेवलेली सही कधीही खराब होत नाही.

फिल्म इंडस्ट्री मध्ये वेगवेगळ्या गाण्यांचे composing करणे, वेगवेगळे morphine effects तयार करणे. लहान मुलांसाठी कार्टुन फिल्म तयार करणे यासाठी कॉम्प्युटचा वापर होतो. आता जवळपास सर्वच स्पोर्टस्मध्ये खेळाडूंचे सर्व रेकॉर्ड साठवून ठेवण्यासाठी सुद्धा कॉम्प्युटरचा वापर होऊ लागला आहे. या व्यतिरिक्त Doctors, Medical stores, Cloth centres सर्व दुकानदार कॉम्प्युटरचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

औद्योगिक क्षेत्र – औद्योगिक क्षेत्रात अत्याधुनिक कॉम्प्युटर्सचा वापर करणे शक्य असते. मशीन सुरु करणे, बंद करणे, वेल्डिंग, पार्टस् असेब्लिंग यासारखी एकसुरी कामे आता रोबोज् करतात, तसेच कार्मचार्‍याचे पगार काढणे व पगाराचे चेक्स प्रिंट करणे यासाठीदेखील कॉम्प्युटर्सचा वापर केला जातो.

प्रिंटिंग टेक्नॉलॉजी – ऑफसेट प्रिंटिंग, स्क्रीन प्रिंटिंग व डिजिटल प्रिंटिंगमध्ये डीटीपी कामासाठी कॉम्प्युटर्सचा फार उपयोग होतो.तुम्ही जे पुस्तक आत्ता वाचत आहात ते कॉम्प्युटरच्या मदतीनेच तयार केले आहे.

ऑटोमोबाईल – अँटी ब्रेक लॉकिंग सिस्टिम म्हणजेच गाडीचे कुलूप तोडण्यास प्रतिबंध करणारी यंत्रणा हे कॉम्प्युटरचे एकच कार्य देखील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये क्रांती करण्यास पुरेसे ठरले आहे.

शिक्षण – कॉम्प्युटर्सचा वापर शिक्षणक्षेत्रातही केला जातो. आता निरंतर शिक्षण किंवा दूर अंतरावरून शिक्षण देणे विस्तृत वर्गातून देणे शक्य झाले आहे. थोडक्यात प्रत्येक क्षेत्रात आता कॉम्प्युटर्सचा वापर अपरिहार्य झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.